विप्लवा एंटरटेनमेंट्स

सर्जनशील अभिव्यक्तीसाठी एक कल्पक उपक्रम !

ध्यास  उत्कृष्टतेचा !

जेव्हा आपल्या कामावर आपली निष्ठा आणि विश्वास असतो आणि कठोर परिश्रम घेण्याची मानसिक तयारी असते, तेव्हा सुरु होतो प्रवास उत्कृष्टतेच्या दिशेने ! मग ते काम कृषी प्रधान असो वा कारखान्यातल्या मालाचे उत्पादन ,  आमच्या लेखी उत्कृष्टतेला  पर्याय नाही. . ह्याच ध्यासापोटी आम्ही आमचा प्रवास सुरु केला आणि आमची ही सर्जनशील धडपड आज एक अनोखे रूप लेवून  तुमच्यासमोर साकारली आहे.

विप्लवा ह्या नावाला न्याय देत, विप्लवा च्या माध्यमातून, रसिकांना काहितरी नाविन्यपूर्ण, पथदर्शी आणि नवकल्पनांचा उन्मेष असलेली कलानिर्मिती देण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. .

आम्ही सादर केलेली प्रत्येक कलाकृती म्हणजे काम आणि सर्जनशीलता ह्यांचा उत्कृष्ट मेळ. आमच्या दृष्टीने सर्जनशीलता ही कधीतरीच वीज चमकावी तशी चमकून लुप्त होत नाही तर जणू ती आमच्या कलापूर्ण आयुष्याचाच एक दैनंदिन भाग बनून गेली आहे. नावीन्यतेचा अनुभव देण्याच्या ह्या प्रवासात,चिरकाल प्रेरणा देणाऱ्या सृजनाशी आम्ही सांधले गेलो आहोत. आम्हाला माहित आहे की , कुठल्याही दृकश्राव्य कलाकृतीचे मूल्यांकन, मग ती कलाकृती नाटक असो, टिव्ही वरची मालिका असो वा वेब मालिका असो, त्यातल्या स्क्रिप्ट मधली कल्पना किती सशक्तपणे  मांडली गेली आहे ह्यावर ठरते.  दृकश्राव्य निर्मिती क्षेत्रात असल्याने आमचा अनुभव असं सांगतो की स्क्रिप्ट म्हणजे कागदावर खरडलेली केवळ एक गोष्ट नसते , तर ती मनात उमटलेली अशी  एक कथा असते की जी कॅमेऱ्याच्या चष्म्यातून वा सादरीकरणाद्वारे आपण थेट वाचू शकतो. फक्त आणि फक्त तेंव्हाच , प्रेक्षक  तिच्याशी समरस होत असतो. ह्याच अनुभूतीतून आमच्या निर्मितीच्या ह्या अनुभवयात्रेत कुठला विषय कुठल्या माध्यमात, नाटक की टीव्ही की वेब सिरीज? अधिक चपखल बसेल ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. 

आमच्या ह्या निर्मितीक्षम  प्रवासात दृकश्राव्य माध्यमाच्या आत्म्याला म्हणजेच गुणवत्तापूर्ण मनोरंजनाला आम्ही कधीच धक्का लागू देणार नाही अशी ग्वाही देतो. विप्लवाच्या माध्यमातून आम्ही सृजनाची अत्युच्च अनुभूती तसेच व्यावसायिक यशासाठी कारणीभूत ठरणारे घटक यांचा योग्य ताळमेळ साधण्यासाठी वचनबद्ध आहोत. 

रंगभूमी

दूरचित्रवाणी (टेलिव्हिजन)

वेब मालिका (वेब सिरींज )

चित्रपट

दर्जेदार मनोरंजनाप्रती वचनबद्ध !

आगामी आकर्षणे ….