Project Description
नीरस वैवाहिक जीवन जगत असलेल्या एका श्रीमंत बाईची , आपल्या महाविद्यालयीन मित्राशी जवळ जवळ २० वर्षांनंतर अचानक गाठभेट होते. गप्पागोष्टींमध्ये तो मित्र तिला तिच्यातल्या हरवलेल्या स्वत्वाची जाणीव करून देतो, ज्यामुळे तिचे आयुष्यच सकारात्मकरीत्या बदलते.
काही लोक आपल्या आयुष्यात येतात,ज्यांना आपण कधीच विसरू शकत नाही. मग ते आपल्यापासून कितीही दूर असले, आपली सतत भेट होत नसली किंवा आपल्यातल्या नात्याला नेमकं नाव देता येत नसलं तरीही ! कॉलेज च्या रियुनिअन च्या निमित्ताने निरंजन शमाच्या आयुष्यात येतो आणि तिला तिचं आयुष्य नव्याने जगण्याचं बळ देतो. “सहेला रे” ही एक अशी परिपक्व प्रेमकथा आहे, जी आपल्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर, नात्यात होणारे बदल समंजसपणे स्वीकारायला शिकवते.