कथा विप्लवाची
१९८६ मध्ये श्री. संतोष गुजराथी ह्यांनी एक नाटक कंपनी म्हणून विप्लवाची मुहूर्तमेढ रोवली. विप्लवाची निर्मिती असलेल्या नाटकांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार लाभले.
जेव्हा २०१६ मध्ये आपल्या निर्मितीमध्ये वैविध्य आणायचा विचार सुरु झाला तेव्हा विप्लवा चे “विप्लवा ऐंटरटेनमेंटस् एलएलपी ” असे नामकरण झाले. नाटके, दूरदर्शन मालिका, चित्रपट ह्याद्वारे प्रेक्षकांना काहीतरी आशयघन द्यावे जेणेकरून मनोरंजनाबरोबरच त्यांना अर्थपूर्ण कलाकृतीचा रसास्वाद घेता येईल ही ह्यामागची प्रेरणा होती. आणि म्हणूनच प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजन मिळावे ह्या हेतूने सशक्त टीम बांधणीच्या हालचालींनी वेग घेतला.
टीम विप्लवा
असं म्हणतात की एकट्यानं काम करणे म्हणजे कामाची सुरवात असते तर मिळून केलेलं काम म्हणजे यशाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असते. राबणारे असंख्य हात आणि बौद्धिक कल्पनांचे आदानप्रदान म्हणजे उच्चतम मूल्ये असलेली निर्मिती , ह्या धारणेने “टीम विप्लवा” व्यावसायिक वाटचाल करण्यावर भर देते. आणि म्हणून संघभावनेनी काम करण्यावर आमचा नेहमीच भर असतो.
श्री. संतोष गुजराथी
व्यवस्थापकीय संचालक
शिक्षणाने अभियंता असलेल्या श्री. गुजराथी यांनी १९९६ मध्ये व्यवसायाची सुरुवात केली. २३ वर्षांच्या प्रदीर्घ व्यावसायिक अनुभवाचा परिपाक म्हणून आर्थिक स्थैर्या बरोबरच, व्यवसाय यशस्वीपणे राबवण्यासाठी लागणारी संघटनात्मक कौशल्ये, मनुष्यबळ जोडणे आणि कलेची जाण ह्याचं संचितच जणू त्यांनी जमा केले आहे. मानवी मनोव्यापारांची उत्तम जाण असल्याकारणाने कलात्मक परिणाम साधणारी व्यावसायिक धोरणे आखण्यात त्यांचा हातखंडा आहे.
श्री. मनोज पाटील
कार्यकारी संचालक
मूळचे अभियंता असलेले श्री. मनोज हे गेल्या २० वर्षांपासून दुबई येथे वास्तव्यास आहेत. व्यावसायिक, नेत्रदीपक सोहळ्यांचे आखीवरेखीव नियोजन आणि व्यवस्थापन ही महत्वाची जबाबदारी ते नेटकेपणाने सांभाळत आहेत. यू.ए.ई मध्ये नाट्य, चित्रपट सृष्टीशी संबंधित अनेक कार्यक्रमांचे उत्कृष्ट आयोजन त्यांनी केले आहे. यू.ए.ई मध्ये, प्रथमच मिफ्टा अर्थात मराठी इंटरनॅशनल फिल्म अँड थिएटर ऍवॉर्डस आयोजित करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.
श्री. मंदार देशपांडे
क्रिएटिव्ह हेड , (कल्पक निर्मिती प्रमुख)
नाट्यक्षेत्रातील एक अत्यंत ऊर्जाशील व्यक्तिमत्व असलेला मंदार हे केवळ अभिनेता किंवा दिग्दर्शकच नव्हे तर एक उत्तम शिक्षकही आहेत . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे नाट्यशास्त्राच्या पदवीपरीक्षेत सुवर्णपदक मिळवलेले मंदार हे गेल्या १२ वर्षांपासून यशस्वी नाट्य अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना, विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission) प्रतिष्ठित अशी कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती (Junior Research Fellowship) देखील बहाल केली आहे. त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले असून भारतातील अनेक नाट्य महोत्सवांमध्ये सहभागी झाले आहेत. यांखेरीज ते, बालगंधर्व, अडगुलं मडगुलं, अरे आव्वाज कुणाचा, लाठे जोशी अशा विविध चित्रपटांशी कलात्मकदृष्ट्या संलग्न राहिले आहेत. ते याआधी टेलिव्हिजन क्षेत्रात कार्यकारी निर्माता आणि क्रिएटिव्ह हेड म्हणून कार्यरत होते.